पानसरेंची रक्षा वृक्षारोपणासाठी,अण्णांचे विचार तेवत ठेवणार !

February 23, 2015 3:41 PM0 commentsViews:

23 फेब्रुवारी : विज्ञानवादी असलेल्या कॉ. गोविंद पानसरेंचा अंत्यविधी कोणतंही धार्मिक कर्मकांड न करता करण्यात आल्यानंतर त्यांचं रक्षा विसर्जन न करण्याचा निर्णय त्यांचे कुटुंबिय आणि कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी घेतलाय. पानसरेंच्या दहनानंतर त्यांची रक्षा गोळा करण्यासाठी पंचगंगा घाटावर आज कार्यकर्ते जमा होतायेत. ही रक्षा विसर्जित न करता कार्यकर्ते आपल्यासोबत घेऊन जाणार आहेत. पानसरेंच्या विचारांची प्रेरणा कायम आपल्या सोबत राहावी यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या देहाची रक्षा आपल्यासोबत घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. दरम्यान, सात दिवसांनंतरही अद्याप कॉ.पानसरेंच्या खुनाच्या तपासात पोलिसांच्या हाती काहीही ठोस लागलं नसल्यामुळे कम्युनिस्ट कार्यकर्त्यात संतापाची भावना आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close