मुंबईच्या विकास आराखड्यावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच

February 23, 2015 4:12 PM0 commentsViews:

fadnavis-udhav

23 फेब्रुवारी : मुंबईच्या विकास आराखड्यावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाने बनवलेल्या आराखड्याला दोन्ही पक्षांचा विरोध असला तरी नवा आराखडा नेमका कुणाच्या मर्जीतला असेलं यावर सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

मुंबईचा विकास आराखडा महापालिकेने बनवला, याचा अर्थ सर्व काही झालंय असं कुणीही समजू नयेे. राज्य सरकारचे नगर विकास विभाग तसेच सल्लागार समिती यांच्याशी चर्चा करूनच जनतेच्या हिताचा सरकार निर्णय घेईल असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेऊन हा आराखडा नेमका कुठल्या पक्षाच्या हिताचा बनवायचा यावर आता शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढीचं राजकारण सुरू झाल्याचं दिसत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close