बंदी असतानाही ‘छमछम’ सुरूच!

February 23, 2015 10:24 PM0 commentsViews:

23 फेब्रुवारी : डान्सबार बंदी असतानाही नवी मुंबईत मात्र बेकायदेशीरपणे डान्सबार सुरूच आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या डोळ्यांसमोरच हे डान्सबार सुरू आहेत. हॉटेल, परमिट रूम, बिअर बार या कुठल्याही ठिकाणी बारबालांवर बंदी घातली आहे. तरीदेखील नवी मुंबईत राजरोसपणे डान्सबार सुरू आहेत. पोलिसांचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरात बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसतेय. बंदी आदेश असतानाही बिनदिक्कतपणे डान्सबार सुरू आहेत. ही परिस्थिती पोलिसांना सांगितल्यानंतरसुद्धा, पोलिसांनी तुम्ही दाखवा आम्ही कारवाई करू, असं उत्तर दिलं आहे.

नवी मुबंईतले मुख्य डान्स बार

– मून नाईट
– नाईट रायडर्स
– साई राज
– टाइम्स
– साई दर्शन
– गोल्डन नाईट्स
– क्रेझी बॉय
– व्हाईट हाउस
– अमित पॅलेस
– सावली
– नाईट अँगल
– नाखवा
– नटराज

छमछमचे दर

– अमित पॅलेस – 4 हजार ते 8 हजार
– व्हाईट हाउस – 9 हजार ते 20 हजार
– साई पॅलेस – 4 हजार ते 8 हजार
– क्रेझी बॉय – 3 हजार ते 5 हजार
– नटराज – 4 हजार ते 12 हजार
– गोल्डन नाईट्स – 5 हजार ते 8 हजार
– टाइम्स – 3 हजार ते 5 हजार
– मून नाईट -4 हजार ते 10 हजार
– नाईट रायडर्स – 3 हजार ते 8 हजार
– सावली – 3 हजार ते 6 हजार

IBN लोकमत चे सवाल

1) डान्स बारला बंदी असूनही नवी मुंबई पोलीसच डान्स बारला खतपाणी घालत आहेत का?

2) स्थानिक पोलीस आणि बार मालक याचं संगनमत आहे का?

3) नोकरनाम्यापेक्षा अधिक मुलींचा बारमध्ये समावेश कसा आहे?

4) नियमांचं उल्लंघन करणार्‍या बार मालकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करणार का?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close