धुसफूस वादळावर युतीची आज समन्वय समितीची बैठक

February 24, 2015 9:11 AM0 commentsViews:

uddhavfadnavis-ss-11-10-1424 फेब्रुवारी : शिवसेना आणि भाजपमध्ये उठलेलं धुसफूस वादळावर आता समन्वयाचा तोडगा काढण्यात आलाय. आज या समन्वय समितीची पहिली बैठक होणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला सेनेचे नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळातले वाद, ‘सामना’च्या अग्रलेखातून होणारी टीका या विषयावर समन्वय समितीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन पक्षांतल्या नेत्यांत वाद होत असतात, त्यावरही चर्चा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत चर्चा पुढच्या बैठकीत होणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close