शासकीय हॉस्टेलमध्ये सुरक्षारक्षकाकडून मुलींचा अत्याचार

February 24, 2015 11:41 AM0 commentsViews:

gondiya_hostelगोंदिया (24 फेब्रुवारी) : समाजकल्याण विभागाकडून चालवल्या जाणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या वसतिगृहात मुलींचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचं उघड झालंय. या वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकाकडूनच लैंगिक छळ होत असल्याचा या वसतिगृहातल्या मुलींचा आरोप आहे. पीडित मुलींनी वॉर्डन सुजाता रामटेकेकडे आणि समाज कल्याण अधिकार्‍यांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने मुलींनी मानवाधिकार संघटनेकडे तक्रार केली आहे. हा सुरक्षारक्षक वसतिगृहाच्या वॉर्डनचा भाऊ आहे.

12 व्या वर्गाची परीक्षा सुरू असताना गोंदियाच्या मागसवर्गीयांच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील मुलीना सुरक्षारकक्षाकडून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हा सुरक्षारक्षक या वस्तिगृहातील वसतिगृहप्रमुखांचा लहान भाऊ असून मागील वर्षभरापासून हॉस्टेलमध्ये राहणार्‍या मुलींशी अश्लील चाळे करत आहे. या संदर्भात वस्तिगृहप्रमुखांकडे आणि समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे तक्रार करून कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे आज मुलींनी माध्यमांना बोलावून हा प्रकार उघडकीस आणला. आता तरी या संदर्भात शिक्षण मंत्री आणि समाज कल्याण विभाग काय कार्यवाही करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र या संदर्भात गोंदिया जिल्हा समाज कल्याण अधिकारी पेंदाम यांना या प्रकरणाची माहिती दिली असता. त्यांनी हॉस्टेलमध्ये पाहणी केली. 12 व्या वर्गात शिकणार्‍या मुलींची परीक्षा सुरू असताना मुलींच्या समस्या एकूण घेण्याऐवजी वस्तिगृहप्रमुख आणि सुरक्षारक्षकाची पाठराखण करताना दिसून आले. वसतिगृहप्रमुख सुजाता रामटेके यांना विचारणा केली असता या संदर्भात माझ्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्यामुळे माहिती दिली नाही. साबास रामटेके हा सुरक्षारक्षक क्रिस्टल कंपनीचा कर्मचारी असून सुजाता रामटेके यांच्या सोबत याच वसतिगृहात राहतो हे विशेष.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close