गाड्या पेटवणार्‍या माथेफिरूचा प्रताप कॅमेर्‍यात कैद

February 24, 2015 12:50 PM0 commentsViews:

aurangabad car burn24 फेब्रुवारी : औरंगाबाद शहर आणि शहराजवळच असलेल्या वाळूज एमआयडीसी परिसरातल्या गाड्या पेटवण्याचं सत्र थांबत नाहीये. गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गाड्या पेटवणार्‍याला पकडण्यात अपयश येतंय.

सोमवारी एकाच दिवशी वाळूज एमआयडीसी आणि औरंगाबाद शहरात माथेफिरूनं एकूण 11 दुचाकी पेटवल्यात. हा माथेफिरू सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झालाय.

तर मागच्या चार दिवसांपासून जवळपास 25 दुचाकी जाळण्यात आल्यात. पोलिसांनी गस्त वाढवलीये. विशेष पथकांच्या माध्यमातून पाळत ठेवली. मात्र आरोपी पकडण्यात पोलिसांना यश येत नाही.त्यामुळं आता नागरीकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close