अशी आहे डायमंड क्रॉसिंग

February 24, 2015 1:11 PM0 commentsViews:

देशाच्या मध्यभागी असणार्‍या नागपूरच्या भौगोलिक महत्वामुळे रेल्वेचे हब म्हणून विकसित होण्याची गरज असतांना समस्यांमुळे रेल्वेचा विकास हवा तसा झाला नाही. गेल्या काही वर्षांत बजेटमध्ये घोषित झालेल्या योजनाही सुरू झालेल्या नाहीत. यात रेल्वेच्या मेडीकल कॉलजची घोषणा, केमिकल टॉललेटचा प्रकल्प, नागपूरचे अजनी रेल्वे स्टेशन अत्याधुनिक असो किंवा नव्या गाड्यांची घोषणा असो यांचा समावेश आहे. दिल्ली -चेन्नई आणि मुंबई कोलकाता हे दोन रेल्वे मार्ग नागपुरात क्रॉस होता. या डायमंड क्रॉसिंगसह नागपूर क्षेत्रात रेल्वेचे जाळे प्रचंड असूनही त्याचा फायदा विदर्भाल झाला नसल्याची खंतही आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close