ठरलं!, जम्मू-काश्मीरमध्ये अबकी बार पीडीपी-भाजप सरकार !

February 24, 2015 2:13 PM0 commentsViews:

jammu_kashmir_new324 फेब्रुवारी : अखेर जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘अब की बार पीडीपी-भाजप सरकार’ यावर शिक्कामोर्तब झालंय. दोन्ही पक्षांनी युती केली असून सरकार स्थापनेची तयारी केलीये. या नवा सरकारचा 1 मार्चला शपथविधी होणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपचं एकत्रित सरकार बनण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. भाजप आणि पीडीपीमध्ये झालेल्या समझोत्यानुसार मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री होणार आहेत. 1 मार्चला या नव्या सरकारचा शपथविधी होईल.या नव्या सरकारमध्ये दोन्ही पक्षांना समसमान मंत्रीपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गेल्या डिसेंबरमध्येच जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या.त्यात पीडीपीला 28 तर भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. पण कलम 370 आणि मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरून भाजप आणि पीडीपीतली सरकारस्थापनेची चर्चा पुढे सरकत नव्हती. पण दिल्ली विधानसभेतील पराभवानंतर भाजपने एक पाऊल मागे घेतल्याने जम्मू काश्मिरमधील सरकारस्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close