नाशिक पश्चिम मतदारसंघात बंडखोरीच पीक

September 21, 2009 2:25 PM0 commentsViews: 11

21 सप्टेंबर भाजपा- सेना युतीच्या विधानसभा जागावाटपानंतर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला आहे. जागा वाटपाच्या या निर्णयानंतर, नाशिक पश्चिम मतदारसंघातल्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. भाजपची उमेदवारी माजी मंत्री डॉ. दोलतराव आहेर यांच्या मुलाला म्हणजे डॉ. राहुल आहेर यांना मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा काय संबंध हे मंत्री होते युतीच्या काळात. नंतर सत्ता गेली आणि हे गेले राष्ट्रवादीत. तिथे त्यांना शून्य किंमत होती आणि त्यामुळे आता सर्वच नगरसेवक नाराज आहेत. असं महापौर विनायक पांडे यांनी म्हटलं आहे. भाजप सोडल्यानंतरही माजी मंत्री डॉ. दोलतराव आहेर मुलाला उमेदवारी दिल्यानं शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात सेनेचे 15 नगरसेवक आहेत तर भाजपाचा एकही नाही. तरीही हा मतदारसंघ भाजपाला सोडल्यानं, दोन दोन बंडखोर उभे राहण्याच्या तयारीत आहेत. साहजिकच, याची किंमत भाजपा-सेनेला मोजावी लागेल असं दिसतंय. बंडखोरांनी तशी तयारीही सुरु केली आहे. महापौर विनायक पांडे या मतदारसंघात दोन वर्षापासून तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर ह्यांनीही लोकांची मतं आजमावल्यावर अपक्ष लढण्याचं ठरवलं आहे. इथे खानदेशी आणि अहिराणी बोलणाराच उमेदवार चालेल. नवीन नाशिकला भद्रकाली करायचं नाहीये. असंही त्यांना यावेळी बोलून दाखवलं. दोन बंडखोर युतीतून आणि हा मतदारसंघ कॉग्रेसला न सोडल्यास आणखीन एक बंडखोर उमेदवार यामुळे नाशिक पश्चिमची निवडणुक खूपच रंगतदार होणार हे नक्की.

close