भाजप आणि शिवसेनेत मतभेद नाही – रावसाहेब दानवे

February 24, 2015 10:24 PM2 commentsViews:

Raosaheb_Danve24 फेब्रुवारी : भाजप आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची बैठक आज (मंगळवारी) मुंबईतील सह्याद्रीवर पार पडली.

या बैठकीत दोन्ही पक्षांनी मंत्रीमंडळातले वाद, सामनाच्या अग्रलेखातून होणारी टीका अशा अनेक मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीला भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील तर सेनेच्या वतीनं दिवाकर रावते आणि सुभाष देसाई उपस्थित होते.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेत मतभेद नाहीत असं रावसाहेब दानवे यांनी बैठकीनंतर सांगितलं. तसचं 4 मार्चला दानवे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Yogesh More

    दानवे साहेब.., पुर्ण महाराष्ट्र जागा आहे.. नी दोन्ही पक्षातले मतभेद पहात आहे…. ! आपणही झोपेतुन जागे व्हा म्हणजे मतभेद दीसतील..

  • Yogesh More

    हे मतभेद नाही तर काय बीजेपी शिवसेनेसी शिमगा खेळतय . प्रत्येक शिवसेनेच्या निर्णयाला विरोध करते . तरी शिवसेना किती दिवस सांभाळून घेणार . पुरी वाट लावली या सरकारने . काहीच समजत नाही . जागतिक मंदीच्या काळात जी समस्या नाही जाणवली ती आत्ता जनवते.

close