तिसर्‍या आघाडीतून डॉ. राजेंद्र गवई बाहेर

September 22, 2009 8:50 AM0 commentsViews: 100

22 सप्टेंबर तिसर्‍या आघाडीचे संयोजक डॉ. राजेंद्र गवई आघाडीतून बाहेर पडले आहेत. पक्ष पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याचा मुद्दा आणि ए-बी फॉर्मच्या विषयात समाधानकारक तोडगा न निघाल्यानं समितीतून बाहेर पडत असल्याचं गवईंनी स्पष्ट केलं आहे. आता ते स्वबळावर विधानसभेच्या 15 जागा लढवणार आहेत. यापूर्वीही गवई यांनी रामदास आठवलेंवर टीका केली होती. आठवले आपल्याला विश्वासात घेत नाहीत. रामविलास पासवान यांना आघाडीत घेण्याबाबतही आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असे आरोप त्यांनी यापूर्वी केले होते. रिपब्लिकन पक्षाला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत अशी तक्रारही ते करत होते.

close