राष्ट्रपतींचा मुलगा रावसाहेब शेखावत यांची उमेदवारी पक्की

September 22, 2009 9:30 AM0 commentsViews: 3

22 सप्टेंबर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांना अमरावती मतदारसंघातून तिकीट निश्चित झालं आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ राज्यमंत्री सुनील देशमुख यांना डावलून रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सुनील देशमुख बंडखोरी करण्याची शक्यता नसल्याचं काँग्रेसच्या गोटातून सांगितलं जात असलं तरी सुनील देशमुखांची समजुत काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी सुनील देशमुखांनी आयबीएन लोकमतला सांगितलं होत की मी कुठल्याही परिस्थितीत ही निवडणुक अमरावती मतदारसंघातूनच लढवणार आहे. त्यामुळे आता देशमुखांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close