काँग्रेस करतेय घराणेशाहीचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न

September 22, 2009 9:36 AM0 commentsViews: 7

22 सप्टेंबर राज्यातल्या बड्या नेत्यांच्या वारसदारांची तिकीटं काँग्रेस हायकमांडनं रोखून धरलीत. काँग्रेसवर घराणेशाहीचा नेहमीच आरोप होतो. बहुदा काँग्रेसनं आपली ही प्रतिमा पुसण्याचा चंग बांधला आहे. राष्ट्रपतींचे चिरंजीव रावसाहेब यांचं तिकीट निश्चित झालं आहे. पण इतर अनेक नेत्यांच्या वारसदारांना आपल्या आमदारकीच्या इच्छेला मुरड घालावी लागेल. यामध्ये विलासरावांचा मुलगा -अमित देशमुख, माणिकरावांचा मुलगा- राहुल ठाकरे, पतंगरावांचा मुलगा – विश्वजीत,सुशीलकुमारांची मुलगी – प्रणीती शिंदे, सुशीलकुमारांचे जावई -राज श्रॉफ, नारायण राणेंचा मुलगा – नितेश राणे, शिवराज पाटील यांची सून – डॉ. अर्चना पाटील तसंच प्रमोद शेंडेंचा मुलगा- शेखर शेंडे आणि प्रभा राव यांचा भाचा- रणजीत कांबळे यांचं भवितव्य मंगळवारी दिल्लीत होणार्‍या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठरणार आहे. वारसदारांना तिकीटं द्यायची की नाही यावर हायकमांड निर्णय घेणार आहे. पण हरियाणा काँग्रेसमधल्या मातब्बर वारसदारांची तिकीटं कापली गेल्यानं राज्यातल्या अनेक बड्या नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.

close