प्लँचेट प्रकरणामुळे गुलाबराव पोळ यांची बदली-अजित पवार

February 25, 2015 6:19 PM0 commentsViews:

pawar on pol25 फेब्रुवारी : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त डॉ. गुलाबराव पोळ यांची बदली प्लँचेट प्रकरणामुळेच झाली, अशी कबुली तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलीये. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास समाधानकारक न झाल्यामुळे गुलाबराव पोळ यांची बदली केली, असंही पवारांनी स्पष्ट केल्यामुळे वाद निर्माण झालाय.

गुलाबराव पोळ तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपास प्रकरणात त्यांनी प्लँचेटचा वापर केल्याचा पर्दाफाश पत्रकार आशिष खेतान यांनी केला होता. पोळ आणि त्यांच्या सहकारी ठाकूर यांनी प्लँचेटचा वापर करून खुद्ध दाभोलकर यांच्या आत्म्याला बोलावून मारेकरी कोण आणि कुठे लपले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. खेतान यांनी या सर्व प्रकाराचं स्टिंग ऑपरेशन करून हा धक्कादायक प्रकार जगासमोर आणला होता. दरम्यान, या प्रकरणाचं सत्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारनं समोर आणलं नव्हतं, आताच्या सरकारनं तरी जनतेला सत्य सांगावं अशी मागणी अंनिसचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close