दक्षिण आफ्रिकेत रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफीची धूम

September 22, 2009 9:40 AM0 commentsViews: 7

22 सप्टेंबर दक्षिण आफ्रिकेत जगातल्या सर्वोत्तम 8 टीम्स एकमेकांना भिडणार आहेत. मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीला मंगळवारपासून सुरूवात होत आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन टीम्समध्ये मंगळवारची पहिली मॅच रंगणार आहे. तब्बल अकरा वर्षात दक्षिण आफ्रिकेला आयसीसीची कुठलीही स्पर्धा जिंकता आलेली नाही. याचं दडपण ग्रॅहम स्मिथ आणि त्याच्या टीमवर असेलच, पण घरच्या मैदानाचा फायदाही त्यांना होणार आहे. सराव मॅचमध्ये खेळताना गिब्जला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या मॅचला तो मुकणार आहे. कॅप्टन ग्रॅहम स्मिथ, ड्युमिनी, कॅलीस यांच्यावर बॅटींगची जबाबदारी असेल, तर बॉलींगची धुरा असेल ती डेल स्टेन, पार्नेल, वॅन डर मर्व यांच्यावर. दुसरीकडे विजयी सलामी देण्यासाठी श्रीलंकेची टीम उत्सुक आहे. महेला जयवर्धने, कुमार संघकारा, तिलकरत्ने दिलशान त्याचबरोबर तुफान फॉर्ममध्ये असलेला बॅट्समन कंदम्बी हे बॅटींगची धुरा सांभाळतील, तर स्पिनचा जादुगार मुथय्या मुरलीधरनवर बॉलिंगची मदार असेल.

close