‘प्रभू’ पावणार?, भाडेवाढ टळणार ?

February 25, 2015 9:59 PM0 commentsViews:

 

rail budget 201525 फेब्रुवारी : ‘अच्छे दिन…,आणि सबका साथ,सबका विकास’ असं गोड स्वप्न दाखवणार्‍या मोदी सरकारची आता परीक्षेची वेळ आलीये. मोदी सरकार चालू वर्षासाठी उद्या रेल्वे बजेट सादर करणार आहेत. नव्याने रेल्वेमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे सुरेश प्रभू काय घोषणा करता याकडे सगळ्या देशाचं लक्ष्य लागलंय. ‘प्रभूं’च्या मनात काय आहे ? असा प्रश्नच सर्वांना पडलाय. पण प्रवाश्यांवर रेल्वे भाडेवाढीची कुर्‍हाड कोसळणार नाही अशी खास माहिती सूत्रांनी दिलीये.

‘अब की बार मोदी सरकार…’,म्हणता म्हणता मोदी सरकारने 100 दिवस पार केले आणि गुण्यागोविंदाने कामाने लागलीये. काही वादग्रस्त आणि काही निर्णायक निर्णय घेत मोदींनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला. संसदीय अधिवेशनला सुरूवात झाली असून मोदी सरकारची कसोटी लागलीये. सर्वसामान्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची बारी आता मोदी सरकारची आलीये. उद्या (गुरुवारी) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू चालू वर्षाचं रेल्वे बजेट सादर करणार आहे. त्यामुळे साहजिक प्रभूंची एक्स्प्रेस धावते की चिरडते हे पाहण्याचं ठरणार आहे.

उद्याच्या रेल्वे बजेटमध्ये यंदा प्रवाशांना तिकीटवाढीची झळ बसणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या अनेक सूचनांचा या रेल्वे बजेटमध्ये समावेश असल्याचं कळतंय. या रेल्वे बजेटबद्दल सूत्रांकडून काही माहिती आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलीये. त्यानुसार गुंतवणूक आकर्षित करणं आणि वायफायसह ट्रेनचं आधुनिकीकरण यावर यंदाच्या बजेटमध्ये भर असण्याची शक्यता आहे. तिकीट दरवाढ होण्याची शक्यता नाही.

पण, सर्वच तिकिटांवर स्वच्छता सेस लागण्याची शक्यता फेटाळता येत नाही. संयुक्त उपक्रम, थेट परकीय गुंतवणूक आणि पीपीपीच्या माध्यमातून रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी लागणारा निधी उभारण्यावरही सरकारचा भर असेल. ‘स्वच्छ भारत अभियाना’प्रमाणे स्वच्छ रेल्वे मोहीम राबवण्याचाही रेल्वेमंत्र्यांचा विचार आहे. या मोहिमेंतर्गत 59 हजार व्हॅक्युम टॉयलेट्स बनवण्यात येतील.

2016 पासून सर्वच गाड्यांमध्ये अशी व्हॅक्युम टॉयलेट्स असतील. सुरक्षेसाठी सर्व कोच आणि स्टेशन्सवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सरकारची योजना आहे. नवीन गाड्यांची घोषणा करण्यापेक्षा सध्या सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकारचा भर असेल. थेट प्रवाशांकडून फीडबॅक घेण्यासाठी कस्टमर पोर्टल तयार करण्याचा सरकारचा विचार आहे. मेक इन इंडियाअंतर्गत भारतातच या पोर्टलसाठीचं तंत्रज्ञान विकसीत करण्यावर भर असेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close