अकोल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली काँग्रेस ऑफिसची

September 22, 2009 9:50 AM0 commentsViews: 2

22 सप्टेंबर काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी अकोल्यातल्या 'स्वराजभवन' या काँग्रेसच्या जिल्हा ऑफिसची मोडतोड केली आहे. तिकीट नाकारल्याने सुरू झालेल्या बंडाळीचं लोन आता अकोल्यातही पोहोचलं आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसनं रमाकांत खेतान यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खेतान यांच्या फोटोला डांबर फासलं, जोडे मारले तसंच त्यांचे बॅनर्स जाळले. या ठिकाणी काँग्रेसचे महापौर मदन बरगड, राणे समर्थक विजय देशमुख, माजी मंत्री अझर हुसेन आणि माजी स्थायी समिती सभासद साजीद खान पठाण हेही इच्छुक होते.

close