सर्व्हे : प्रवाशांना हव्यात सोयीसुविधा आणि तत्काळ रद्द तिकिटांचे पैसे !

February 25, 2015 11:07 PM0 commentsViews:

rail budget 2015_4425 फेब्रुवारी : गेली अनेक वर्षं, आघाडीचं सरकार रेल्वे बजेट सादर करत होतं. पण पहिल्यांदाच संपूर्ण बहुमतातलं सरकार बुधवारी बजेट सादर करणार आहे. त्यामुळेच या सरकारकडून आणि बजेटकडून अपेक्षा जास्त आहेत. लोकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि रेल्वेमध्ये सुधारणा कशी करता येऊ शकते यावर – टुडेज चाणक्यने एक सर्व्हे केलाय.

अगदी तत्काळ रिझर्व्हेशनपासून ते रेल्वेतली सुरक्षा, सफाई या सगळ्याविषयीचे प्रश्न यात विचारण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे प्रवाशांनी रेल्वे सोयीसुविधांवर तीव्र नाराजी व्यक्त केलीये. 74 टक्के लोकांनी रेल्वेच्या सुविधांवर असमाधानी व्यक्त केलीये.

लोकांना नव्या गाड्या नकोत पण सोयी सुविधा पाहिजे असाही निष्कर्ष या सर्व्हेतून निघालाय. तसंच रद्द केलेल्या कन्फर्म्ड तत्काळ तिकिटांचे पैसे मिळावेत असं 73 टक्के लोकांनी मत नोंदवलंय.

असा आहे चाणक्याचा सर्व्हे

तुम्हाला नव्या गाड्या हव्या की सध्या असलेल्या गाड्यांमध्ये चांगल्या सोयी हव्या?
नव्या गाड्या        20%
चांगल्या सोयी    74%

रद्द केलेल्या कन्फर्म्ड तत्काळ तिकिटांचे थोडेतरी पैसे परत मिळावे का?
होय        73%
नाही        15%

तत्काळ तिकिटाचं रिझर्व्हेशन करणं कठीण आहे की सोपं?
खूप कठीण         40%
कठीण            31%
सोपं                11%
खूप सोपं            8%

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधल्या स्वच्छतेबद्दल तुम्ही समाधानी आहात का?
होय        11%
नाही        78%

ट्रेनमध्ये मिळणार्‍या अन्नाच्या दर्जाबाबत तुमचं मत काय?
चांगलं    13%
ठिकठाक    23%
खराब     56%

स्टेशनवरचे कुली पैसे उकळतात, असं तुम्हाला वाटतं का?
होय        67%
नाही        20%

तिकीट बुक करताना तुम्ही कुठल्या बर्थला पहिली पसंती देता?
लोअर बर्थ     51%
अप्पर बर्थ        14%
साईड लोअर बर्थ    19%
साईड अप्पर बर्थ    7%

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close