रेल्वेमंत्री, इकडं लक्ष द्या !, रेल्वेचं कँटिन आहे, की टॉयलेट ?

February 25, 2015 11:30 PM0 commentsViews:

25 फेब्रुवारी : उद्या रेल्वमंत्री रेल्वे बजेट सादर करणार आहेत..देशभरात रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा या रेल्वे बजेटकडून आहेत…वारंवार रेल्वेची अव्यवस्था, अस्वच्छता, दुर्लक्ष याबद्दल बोललं जातंय. पण आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत धक्कादायक वस्तुस्थिती…नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर तुम्ही जे पदार्थ खाता ते किती भयानक परिस्थितीत बनवलं जातंय..’याचा आँखो देखा हाल…’ज्या किचनमध्ये हे जेवण बनवलं जातं त्याच किचनचा रेल्वेच्या केटरिंग सेवेचे कर्मचारी टॉयलेट म्हणूनही वापर करतायेत.rail sting opration

हे रेल्वे स्टेशन आहे देशाच्या राजधानीतलं…याच स्टेशनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत योजनेची सुरुवात केली होती…पण या अभियानाची वस्तुस्थिती काय आहे ते ही दृश्यं सांगतायेत..

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरचा हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1…आणि हा या कँटिनमधला मुख्य आचारी आहे. कँटिनमधल्या भाज्या आणि भांडी जिथं धुतली जातात तिथल्या जागेचा वापर बाथरूमसारखा केला जातोय…आणि तिथंच हा आचारी लघवीही करताना दिसतोय.

आणि ही अवस्था आहे याच प्लॅटफॉर्मवर असलेल्या दुसर्‍या एका रेल्वे किचनची…प्रवाशांसाठी केलेलं उरलेलं अन्न हे असं उघड्यावरच ठेवलं जातं…हा बंद असलेला कुलरही तुम्ही पाहू शकता…इथले ड्रेनेज पाईप्सही चोक झालेत..सगळ्यात वाईट म्हणजे या रेल्वे कर्मचार्‍यांचा उद्दामपणा..

हा जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म क्रमांक 20 आहे…हे किचन रेल्वे कर्मचार्‍यांसोबत स्टेशनवरचे दुकानदारही वापरतात..याच ठिकाणी 15 रुपयांत मिळणारी फूड पॅकेट्स गोळा केली जातात. या किचनची अवस्था अत्यंत भयानक आहे. इथल्या फरशीवर माती, चिखल आहे…आणि या खोलीत सतत कुबट वासही भरुन राहिलेला असतो…आणि इथला आचारी…खरं तर त्यानं संपूर्ण गणवेशात असायला हवं…पण इथे तर तो फक्त आतल्या कपड्यांवर जेवण बनवताना दिसतोय.

एकीकडे हे मन सुन्न करणारं वास्तव आहे…तर दुसरीकडे थोडासा आशेचा किरणही आहे..हे ओखलातलं IRTCचं कँटिन आहे…इथून राजधानी, शताब्दी सारख्या विशेष ट्रेन्सना जेवण पुरवलं जातं…इथं आपण स्वच्छता पाहू शकतो…जवळपास प्रत्येक तासाला हे कँटिन स्वच्छ केलं जातं…पण तरीही काही त्रुटी आहेतचच इथंही अन्न झाकलेलं दिसत नाही आणि जेवण बनवताना किंवा पॅक करताना इथले कर्मचारी हातात ग्लोव्हजही घालत नाहीत…इतकंच नाही तर फ्रीजही वापरला जात नाही…रेल्वेच्या कँटिनची अशीच अवस्था देशातल्या अनेक स्टेशन्सची आहे…त्यामुळेच प्रवास करताना रेल्वेतलं जेवण घेणं अनेकदा प्रवाशांच्या जीवावर येत…या बजेटमध्ये तरी यासाठी काही केलं जाईल काय हे पहावं लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close