या आहेत रेल्वे बजेटमधील घोषणा

February 26, 2015 2:11 PM0 commentsViews:

rail budget_suresh prabhuनवी दिल्ली (26 फेब्रुवारी ) : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर केलं.सुरेश प्रभूंनी सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देत भाडेवाढ केली नाही. भाडेवाढ जैसे थेच ठेवण्यात आलीये. मात्र, कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आले नाही. महाराष्ट्राच्या वाट्यालाही फारस काही हाती लागलं नाही. रेल्वे बजेटमधील हे महत्त्वाचे मुद्दे

महत्त्वाचे ठळक मुद्दे
- कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा नाही
- भाडेवाढ जैसे थे
- बुलेट ट्रेन 2015 मध्ये धावणार
- 400 स्टेशनांवर मिळणार मोफत वायफाय सुविधा
- कॉर्पोरेट ब्रँडिंगसाठी स्टेशन आणि गाड्यांचा वापर करणार
- मोठ्या स्टेशनवर लिफ्ट आणि एस्केलेटरसाठी 120 कोटींची तरतूद
- एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढवणार
- स्वच्छ रेल, स्वच्छ भारत
- नवीन टॉयलेट्स 6500 स्टेशन्सवर बांधणार
- कोचेसमध्ये बायो टॉयलेट्स
- 17 हजार नवीन बायो टॉयलेट्स
- प्रवाशांच्या समस्या आणि तक्रारींसाठी 138 हेल्पलाईन नंबर
- रेल्वे सुरक्षेविषयी टोल फ्री नंबर 182

- मल्टी नॅशनल बँक आणि इतर घटक आर्थिक वाटा उचलायला तयार -प्रभू
- आम्हाला 30 हजारांहुन अधिक सुचना मिळाल्यात आणि आम्ही व्यावसायिक सुचनावर काम करण्यास सुरुवात केली -प्रभू
- आम्ही हळूहळू पुढे पाऊल ठेवू, दशकांची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी वेळ लागेल- प्रभू
- रेल्वेकडून खूप अपेक्षा असून त्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे- प्रभू
- मोठा दिलासा, प्रवासी भाड्यात वाढ होणार नाही -प्रभू
- स्वच्छ रेल, स्वच्छ भारत कार्यक्रम राबवणार -प्रभू

रेल्वेमंत्र्यांच्या घोषणा
- नवीन टॉयलेट्स 6500 स्टेशन्सवर बांधणार
- कोचेसमध्ये बायो टॉयलेट्स
- 17 हजार नवीन बायो टॉयलेट्स
- प्रवाशांच्या समस्या आणि तक्रारींसाठी 138 हेल्पलाईन नंबर
- रेल्वे सुरक्षेविषयी टोल फ्री नंबर 182
- डेबिट कार्ड ऑपरेटेड मशीन्स आणणार
- तिकिटांसाठी आता तासंतास थांबावं लागणार नाही
- रेल्वे ऑपरेशन पाच मिनिटं राबवणार, पाच मिनिटांत मिळणार तिकिट
-108 ट्रेन्समध्ये ई-केटरिंगची सुविधा
- महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे लावणार
- आता जनरल क्लासमध्येही मोबाईल चार्जिंग सुविधा
- मुंबईत एसी ट्रेन सुरू करणार
- जनरल श्रेणी डब्यांची संख्या वाढवणार
- सवारी डब्यांची संख्या वाढवणार
- अंधासाठी – सर्व नवीन कोचमध्ये ब्रेललिपी असतील
- खासदारांची विभागीय समिती स्थापून समस्यांचा अभ्यास करणार
- मधला बर्थ महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवणार
- आता 120 दिवसांपूर्वी बुकिंग शक्य
- मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडियावर भर देणार
- ज्येष्ठ नागरीक ऑन लाईन बूक करू शकणार व्हील चेअर
- बहुभाषीय ई तिकिट व्यवस्था आणणार
- मोठ्या स्टेशनवर लिफ्ट आणि एस्केलेटरसाठी 120 कोटींची तरतूद
- रेल्वेच्या आसन व्यवस्थेत बदल करणार
- उत्तर-पूर्व राज्यांना रेल्वेनं जोडणार
- माल वाहतुकीची क्षमता वाढवावी लागणार
- फोनवर करता येणार तिकिटाचं रिझर्व्हेशन
- 400 स्टेशनांवर मिळणार मोफत वायफाय सुविधा
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 67 टक्के जास्त फंड दिला जाणार
- रेल्वे अपघात टाळण्यासाठी आधुनिक उपकरण बसवणार
- गर्भवती महिलांसाठी लोअर बर्थ राखीव
- एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढवणार
- रोजगारांची संधी उपलब्ध करून देणार
- अपर बर्थसाठी आरामदायक पायर्‍या लावणार
- शेतकर्‍यांसाठी कार्गो सेंटर उभारणार
- आग रोखण्यासाठी वार्निंग सिस्टिम लावणार
- निवडक मार्गांवर रेल्वे धडकरोधक यंत्र लावणार
- चालू गाड्यांमधील उपलब्ध तिकिटांची माहिती मोबाईल ऍपवर मिळणार
- बनारस हिंदू महाविद्यालयात मालवीय पीठ स्थापणार
- चार महाविद्यालयांमध्ये रेल्वे अनुसंधान केंद्र उभारणार
- रेल्वे ट्रॅकच्या तपासणीसाठी डिजिटल यंत्रणा असणार-प्रभू
- अहमदाबाद हाय स्पीड ट्रेन 2015 मध्ये चालू होणार
- महाराष्ट्राच्या वाट्याला – वर्धा-नागपूर थर्ड लाईन सुरू करणार -प्रभू
- आरपीएफ जवानांसाठी योगा – प्रभू
- कॉर्पोरेट ब्रँडिंगसाठी स्टेशन आणि गाड्यांचा वापर करणार -प्रभू
- गुंतवणुकीसाठी नव्या उपाय योजना अंंमलात आणणार -प्रभू

सुरेश प्रभूंची फटकेबाजी

- मेरे मन मैं सवाल उठता हे प्रभू ये कैसा होंगा
- इतकं सारं आहे तर रेल्वेचा पुनर्जन्म का शक्य नाही? -प्रभू
- बजेट भाषणात ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’चा रेल्वेमंत्र्यांकडून उल्लेख
- पुढच्या पाच वर्षात रेल्वेत अमूलाग्र बदल अपेक्षित प्रभू

 रेल्वे बजेटसाठी पाच लक्ष्य
1 – प्रवासी केंद्रीत सेवा
2 – सुरक्षित रेल्वे प्रवास
3- अद्यायावत पायाभूत सुविधा
4 – आर्थिक स्वयंपूर्णता
5 – कमी वेळात गरजेच्या गोष्टींना महत्व
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close