रेल्वे बजेटवर शिवसेना नाराज

February 26, 2015 4:01 PM0 commentsViews:

sena on prabhu26 फेब्रुवारी : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर केलं. सर्व स्तरातून बजेटचं कौतुक होत आहे तर कुठे टीका होत आहे. मात्र, बजेटवरूनही एनडीएचा घटक पक्ष शिवसेनेनं पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळलाय. रेल्वे बजेटवर शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

पायाभूत सुविधा, औद्योगिक वाढ, कृषी क्षेत्राची वाढ होण्याच्या दृष्टीने या रेल्वे बजेटमध्ये पावलं उचलली नाहीत. नवीन रेल्वे प्रकल्पही नाही ही निराशाजनक बाब अशी नाराजी शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. तर शिवसेनेची नाराजी हा नेहमीचा विषय झालाय असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. या बजेटमुळे देशातली रेल्वे रूळावर आणण्याचं काम करण्यात आलंय. कुठल्याही प्रदेशाला नाही तर सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेऊन बजेट मांडलंय असा दावाही रावसाहेब दानवेंनी केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close