मुंबईकरांना गारेगार दिलासा, एसी लोकल येणार

February 26, 2015 5:02 PM0 commentsViews:

rail budget coverage by ibnlokmat.tv (29)26 फेब्रुवारी : लोकलमध्ये घामाघामू होणार्‍या मुंबईकरांना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गारेगार दिलासा दिलाय. आज (गुरुवारी) रेल्वे बजेटमध्ये प्रभूंनी कोणत्याही लोकप्रिय घोषणा किंवा नवीन गाड्यांची घोषणा करण्याच्या परंपरेला फाटा देत आशादायी बजेट सादर केलंय. खास करून महाराष्ट्राची राजधानी मंुबईसाठी एसी लोकल आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या दोन महत्वपूर्ण घोषणा केल्या आहे.

मुंबईची लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन…त्यामुळेच रेल्वे बजेटमध्ये मुंबईच्या वाट्याला काय येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. गेल्या दोन बजेटमध्ये मुंबईकरांच्या पदरी निराशाच आली होती. मात्र, आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या एसी लोकलला प्रभूंनी ग्रीन सिग्नल दिलाय. मुंबईसाठी एस्सी लोकल सुरू करण्याची महत्वपूर्ण घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केलीये. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा या वर्षी सुरुवात करणार अशी घोषणा केलीये. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकता ट्रॅकचे वेग वाढवणे, मुंबई-दिल्लीसह नऊ मार्गांवर हायस्पीड गाड्या या घोषणाही करण्यात आल्यात. विशेष म्हणजे रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बजेटमध्ये चांगली तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसंच नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात रेल्वेतील स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांसाठी रेल्वेच्या जनरल डब्यात मोबाईल चार्जिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या मोजक्या काही घोषणा वगळता यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये ‘प्रभूं’नी मुंबईकरांवर फार काही घोषणांचा पाऊस पाडलेला दिसत नाही.

मुंबईसाठी बजेटमध्ये

दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकता ट्रॅकचे वेग वाढविणार
मुंबई-दिल्लीसह नऊ मार्गांवर हायस्पीड गाड्या सुरू करणार
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम याचवषच् सुरू करण्यात येणार
मुंबईमध्ये वातानुकुलित रेल्वे चालवणार
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close