RBI चा बँक ग्राहकांना दिलासा

September 22, 2009 1:22 PM0 commentsViews: 9

22 सप्टेंबर RBI ने बँक ग्राहकांना दिलासा दिला आहे. इतर बँकांसाठी आरबीआयने एक नियमावली जाहीर केलीय. यानुसार ग्राहकाने डिपॉझिट केलेल्या चेकच्या कलेक्शनसाठी उशीर झाला तर ग्राहकाने न मागताही बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागेल. बँकेला आपल्या व्याजदरांची पूर्ण माहिती ग्राहकाला द्यावी लागेल. फ्लोटिंग रेट आकारत असल्यास हा दर कोणत्या आधारावर आकारला जातोय याची माहिती द्यावी लागेल. कर्ज द्यायच्या आधी महत्त्वाच्या नियमांची आणि अटींची माहिती बँकेला ग्राहकाला द्यावी लागेल. तर इन्शुरन्स स्कीम विकायच्या आधी आता ग्राहकाची लेखी परवानगी घ्यावी लागेल. सोबतच बँकेच्या सर्व्हिसेस आणि प्रॉडक्टस विकणार्‍या एजंटनाही आता या सगळ्या अटी पाळाव्या लागतील.

close