बबनदादा शिंदे माढ्यातूनच लढणार

September 22, 2009 1:24 PM0 commentsViews: 136

22 सप्टेंबर राष्ट्रवादीने माढा मतदारसंघातून बबनदादा शिंदे यांची उमेदवारी दिली आहे. तर पंढरपूरातून विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खुद्द शरद पवारांनीच सुधाकर परिचारक यांची समजूत काढल्याचं बोललं जातंय. सुधाकर परिचारक हे पंढरपूरचे विद्यमान आमदार आहेत. माढ्याच्या उमेदवारीमध्ये दोन दादांच्या वर्चस्वासाठी लढाई सुरु होती. शेवटी या वर्चस्वाच्या संघर्षामध्येच अजितदादा गटाच्या बबनदादा शिंदेंनी आपली उमेदवारी राखण्यात बाजी मारली अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे मुंबईत विद्या चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांना घेराव घातला. आपला दिंडोशी मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याचा राग त्यांच्या मनात होता. तिकडे दिल्लीत, प्रफुल्ल पटेल यांची पुण्यातल्या आठ जागांवरून काँग्रेसशी बैठक चालूच आहे. हा वाद जेव्हा सुटेल तेव्हाच काँग्रेसची आघाडी जाहीर होईल हे नक्की.

close