जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

September 22, 2009 1:50 PM0 commentsViews: 2

22 सप्टेंबर काँग्रेस-राष्ट्रवादीमधली जागावाटपाची रस्सीखेच अजूनही सुरूच आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातल्या जागांच्या अदलाबदलीत पेच निर्माण झाला आहे, त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला 114 पेक्षा एखादी- दुसरी जागा जास्त सुटण्याची शक्यता आहे. 174:114 या फार्मुल्याला प्रमाण मानून जागावाटपाची चर्चा झाली. पण, वाटाघाटीत राष्ट्रवादीने काही महत्त्वाच्या जागांच्या बदल्यात आपल्याला सोयीस्कर असलेल्या जागा सोडवून घेतल्याचं समजतंय. तसंच सध्या दोन-तीन जागांचा तिढा सोडवतांना आणखी एखादी जागा पदरात पाडून घेऊन राष्ट्रवादी आपल्या एकूण जागांची संख्या 115 वर नेऊ शकते अशी सद्यपरिस्थिती आहे.

close