मराठी दिनीच अभिजात दर्जाचा मुहूर्त टळला

February 27, 2015 9:15 AM0 commentsViews:

marathi darja27 फेब्रुवारी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतचा आजचा मराठी भाषा दिनाचा मुहूर्त टळला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने हालचाल केली खरी पण या प्रकरणाची फाईल सध्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे आहे.

त्याला अजून कायदा अजून कायदा आणि गृहमंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाहीये. या प्रक्रियेला किमान 15 दिवस लागणार आहेत. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला आता उशिर होणार आहे.

27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्याचदिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. पण हा मुहूर्त आता टळलाय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close