यूपीएच्या भूसंपादन कायद्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला -जेटली

February 27, 2015 11:43 AM0 commentsViews:

a112_arun_j27 फेब्रुवारी : यूपीए सरकारच्या काळात मंजूर झालेला भूसंपादन कायदा सदोष होता अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राज्यसभेत केली. इतकंच नाही तर या कायद्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

या कायद्यामुळे पाकिस्तानला सीमेलगतच्या महत्त्वाच्या संरक्षण प्रकल्पांची माहिती मिळवणं शक्य झालं होतं असं जेटली म्हणाले. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेमध्ये हस्तक्षेप करताना जेटलींनी हा मुद्दा मांडला.

संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांसाठी जमीन घेतानाही 70 टक्के जमीनधारकांची संमती आवश्यक असल्यामुळे पाकिस्तानला यासंबंधी माहिती मिळणं सोपं होतं असं जेटली म्हणाले. हे विधेयक शेतकरीविरोधी असल्याची विरोधकांची टीका निरर्थक असल्याचंही ते म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close