‘आमच्या नावाने खडे फोडता’

February 27, 2015 6:50 PM0 commentsViews:

27 फेब्रुवारी : भूसंपादन विधेयकाबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचा आरोप केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. आज (शुक्रवारी) मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या विधेयकाचं आणि मोदी सरकारच्या इतर निर्णयांचं जोरदार समर्थन केलं. राज्यात आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हाचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांना पत्र लिहून 80 टक्के सहमतीची अट काढण्याची मागणी केली होती असं गडकरी यांनी म्हटलंय. दरम्यान, एस्सार या कंपनीचा पाहुणचार घेतल्याच्या बातमीवरही नितीन गडकरी यांनी खुलासा केला. मी कोणत्याही उद्योजकाकडून पैसे घेतले नाहीत. नॉर्वेच्या सहलीचा खर्च मीच केला होता असं ते म्हणाले. तसंच एस्सार कंपनीनं आमंत्रण दिलं म्हणून मी त्यांचं यॉट बघायला गेलो होतो असंही ते म्हणाले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close