विदर्भ हा 106 वा हुतात्मा, मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य

February 27, 2015 8:39 PM0 commentsViews:

cm fadanvis on ncp27 फेब्रुवारी : ऐकीकडे मराठी भाषा दिन साजरा होत आहे तर दुसरीकडे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातला विदर्भ हा 106 वा हुतात्मा आहे असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते.

नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरूण साधू यांना जनस्थान पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर करारांच्या माध्यमातून विदर्भाने हे मान्य केलंय की, माझी मुंबई, माझ्या मराठी माणसाची मुंबई, मराठी राज्यातच राहिली पाहिजे. त्यावेळी फजल अली कमिशनने विदर्भाचं राज्य करा अशी मान्यता दिली होती. पण तरी देखील मराठी राज्यात येईल आणि मराठी माणसाची मुंबई मराठी माणसालाच देईन, हा 106 वा हुतात्मा होता आणि त्या 106 व्या हुतात्माचा इतिहास सांगणार मुख्यमंत्री म्हणून मी आज या महाराष्ट्रात आहे असं खळबळजनक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच जोपर्यंत मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहिलं असंही ते म्हणाले. ऐन मराठी दिनाच्या दिनी मुख्यमंत्र्यांनी खळबळजनक वक्तव्य केल्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close