अच्छे दिन येणार का ?

February 27, 2015 10:15 PM0 commentsViews:

 

234arun_jetly

27 फेब्रुवारी : ‘अच्छे दिन…’ असं गोड आश्वासन देणार्‍या मोदी सरकारची आता दुसरी मुख्य परीक्षा उद्यावर आलीये. अर्थमंत्री अरूण जेटली आज (शनिवारी) देशाचं आर्थिक वर्ष 2015-16 साठीचं बजेट सादर करणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या घोषणा यातून होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. पायाभूत सुविधा आणि बँकिंग क्षेत्रामधल्या गुंतवणुकीवर या बजेटचा भर असण्याची अपेक्षा आहे. सोबतच FDI संदर्भातल्या घोषणाही होतील. जेटली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवतात का यावर सामान्य करदात्याचं लक्ष असणार आहे.

तर दुसरीकडे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणीचा अहवाल सरकारने मांडला. या अहवालामध्ये आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर 8.1 ते 8.5%च्या दरम्यान राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे येत्या काही वर्षात प्रगतीचा दर दुहेरी आकडा गाठेल अशा आशावाद वर्तवण्यात आलाय. एप्रिल ते डिसेंबर कालावधीमध्ये महागाईच्या दरात घसरण झाली असून आर्थिक वर्ष 2015-16मध्ये महागाईचा दर 5 ते 5.5% राहण्याची अपेक्षा आहे.

या घोषणा होण्याची शक्यता
- रोजगार उपलब्ध करुन देणार्‍या क्षेत्रावर भर
- रेल्वे, पायाभूत सुविधा आणि फूड प्रोसेसिंग विभागाला गती देणार
- घर घेणारा आणि बांधणार्‍याला करसवलत
- गृहकर्जावरील व्याजावर करसवलत
- घराचं स्वप्न प्रत्यक्षात येणार
- लघु आणि मध्यम उद्योगांना पतपुरवठा करण्यावर भर
- छोटा पतपुरवठा करण्यावर भर
- नव्या फंडमध्ये अधिक पैसा ओतणार
- सरकारी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक
- NTPC, ONGC आणि कोल इंडियाचे नवे प्रोजेक्ट
- सरकार आणि सरकारी कंपन्यांच्या पुढच्या गुंतवणुकांविषयी घोषणा
- पायाभूत सुविधांविषयीच्या मोठ्या प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न
- काही पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी फास्ट ट्रॅक परवानग्या
- संरक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा
- मेक इन इंडियावर भर
- परदेशी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी करणार

: कसे असतील अर्थसंकल्प
- 2015 – निर्णय घेणारा
- 2016-17 – अंमलबजावणी करणारं
- 2017-18 – तरतुदींचा परिणाम दर्शवणारा
- 2019 – निवडणूक बजेट

आर्थिक पाहणीचा अहवाल 2015-16

- आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर 8.1 ते 8.5%च्या दरम्यान राहील
- येत्या काही वर्षात प्रगतीचा दर दुहेरी आकडा गाठेल
- एप्रिल ते डिसेंबर कालावधीमध्ये महागाईच्या दरात घसरण झाली
- आर्थिक वर्ष 2015-16मध्ये महागाईचा दर 5 ते 5.5% राहण्याची अपेक्षा
- वित्तीय तुटीचं प्रमाण 4.1%वर रोखणार.
- वित्तीय तूट भविष्यात 3% वर आणणार
- देशात येणारी गुंतवणूक वाढवण्यासाठी PPP मॉडेलचा वापर करणार
- जनधन योजना, आधार आणि मोबाईलच्या माध्यमातून गरीबांपर्यंत थेट मदत पोहोचवणार
- GDP आणि एक्पोर्ट्स वाढवण्यासाठी GST लागू करणार

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close