बिग बींनी टोचले वाहतूक विभागाचे कान

February 28, 2015 9:38 AM0 commentsViews:

 

28 फेब्रुवारी :  अमेरिकेत एखाद्याला वाहन चालकाचा परवाना मिळवायचा असेल तर तब्बल नऊ महिने कठोर परीक्षेला सामोरे जावे लागते, मात्र आपल्याकडे चिरीमिरी देऊन अवघ्या नऊ मिनिटांतच परवाना मिळतो, अशी बोचरी टीका अभिनेता अमिताभ बच्चन यांनी व्यवस्थेचेच कान टोचले आहेत.

ठाणे पोलिसांच्या वतीने गेले दोन महिने सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा एक आव्हान या अभियानाचा समारोप काल (शुक्रवारी) ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बिग बी आले होते, यावेळी ते बोलत होते.

मी गुजरातमध्ये टुरिझम विकू शकतो तर राज्यासाठी वाहतूक नियमाची जनजागृती नक्कीच चकरू शकतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचं बरोबर मराठी दिनानिमित्त शुभेच्छा देत आपणही मराठी शिकत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close