बजेट : कॉर्पोरेटसाठी पायघड्या, मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री !

February 28, 2015 3:13 PM0 commentsViews:

19189_201502280803_940x35528 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ‘कुछ फुल खिलाने बाकी है, मुश्किल ये है की बाग में अबतक काँटे पुराने है’ अशी शेरेबाजी करत चालू वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केलाय. इन्कम टॅक्स जैसे थेच ठेवून सर्वसामान्यांना एकीकडे दिलासा दिला आणि दुसरीकडे सेवा करात वाढ करून खिश्याला कात्री लावलीये पण त्याचवेळी विम्याच हमीही देण्यात आलीये. तर कॉर्पोरेटकरांच्या करात कपात करून नवा मार्ग मोकळा करून दिलाय. काळापैशांच्या मुद्यावर नवं विधेयक आण्याची घोषणा, श्रीमंतांच्या टॅक्समध्ये वाढ अशी महत्वपूर्ण घोषणा करून ‘अच्छे दिन’ दाखवण्याचा प्रयत्न जेटलींनी केलाय.

संपूर्ण बहुमताने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपलं पहिलंवहिलं संपूर्ण बजेट आज सादर केलं. लोकसभेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दीड तास भाषण करून देशाच्या विकासाचं आश्वासक असा ‘संकल्प’ मांडला. ‘कुछ फुल खिलाने बाकी है मुश्किल ये है की बाग में अबतक काँटे पुराने है’अशी शेरोशायरी करून जेटलींनी यूपीए सरकारला चांगलाच चिमटा काढला. त्यानंतर त्यांनी एक-एक मुद्देसूदपणे बजेट सादर केलं. आपल्या भाषणात त्यांनी विकासदरात 8 ते 8.5 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचा विश्वास व्यक्त केला. अनेक महत्वपूर्ण घोषणा केलीये.

इन्कम टॅक्स जैसे थे, पण सज्जड इशाराही !

जेटलींनी आपल्या बजेटमध्ये सर्वसामान्य आणि चाकरमान्यांना दिलासा दिलाय. इन्कम टॅक्समध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. पण दुसरीकडे उत्पन्न आणि मालमत्ता कर लपवण्याचा प्रयत्न केला तर 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते अशा इशाराही दिलाय. त्याचबरोबर – परदेशी मालमत्तांवरचे टॅक्स रिटर्न न भरणार्‍यांना 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलीये. त्यामुळे एकीकडे दिलासा आणि दुसरीकडे गदाही ठेवण्यात आलीये. तर कॉर्पोरेट क्षेत्रासाठी ‘रेड कॉर्पेट’ टाकण्यात आलीये. कॉर्पोरेट टॅक्समध्ये 5 टक्के कपात करून 30 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणण्यात आलाय. पण ही कपात येत्या 4 वर्षांत कॉर्पोरेट टॅक्समध्ये 5 टक्क्यांची असणार आहे.

गरिबांसाठी विमा कवच

‘सबका साथ, सबका विकास’ आपली घोषणा सार्थक ठरवत जेटलींनी सर्वसामान्यांनासाठी अटल पेन्शन योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची घोषणा केली. अटल पेन्शन योजनेसाठी सरकार 50 टक्के निधी भरणार आहे. 31 डिसेंबरपूर्वी अकाऊंट उघडणार्‍या गरिबांना वयाच्या 60 वर्षांपासून पेन्शन सुरू होणार आहे. तर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करणार असून या योजनेत महिना 12 रुपये भरल्
यास दुर्घटनेनंतर 2 लाख रुपये मिळणार आहे.

काय होणार स्वस्त

बजेटमध्ये नेहमी प्रमाणे काही वस्तू स्वस्त आणि महाग करण्यात आल्या आहेत. 22 वस्तूंवरच्या कस्टम ड्युटीत कपात करण्यात आल्यामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या होणार आहे. ब्रँडेड बूट, चामड्याची चप्पल, डिजिटल कॅमेरे, ऍम्ब्युलन्स सर्व्हिस, प्राणीसंग्रालयाची सेवा, अगरबत्ती, एलसीडी, एलईडी, कृत्रिम ह्रदय स्वस्त झालंय.

काय झालं महाग

सेवाकरात 12.36 वरून 14 टक्के वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं जाणार आहे. नेहमीप्रमाणे तंबाखू, सिगारेट, गुटखा,पानमसाला महागणार आहे. त्याचबरोबर हॉटेलिंग करणे, पार्लर, पर्यटन, जीममध्ये जाणं आता महागात पडणार आहे. ऑनलाईन किंवा शॉपिंग करतांना आता क्रेडिट, डेबिट कार्ड सांभाळून वापरावं लागणार आहे. कारण क्रेडिट, डेबिट कार्ड खरेदी करणं महागणार आहे. तसंच आर्किटेक्टकडून घराचं डिझाईन तयार करून घेणं महागणार आहे. ऍम्ब्युलन्स सेवा स्वस्त करण्यात आली खरी पण हॉस्पिटलमधील उपचार महागणार आहे. कुरिअर, लग्नाचे मंडपाची फी आणि एजंटकडून विमानाचे तिकीट मागवणे महागात पडणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close