‘बुरे दिन’ येणार, काय होणार महाग ?

February 28, 2015 4:04 PM0 commentsViews:

union budget hike4328 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेट सादर केलंय. बजेटमध्ये सेवाकर 12.36 वरून 14 टक्के करण्यात आल्यामुळे अनेक प्रकारच्या सेवा महागणार आहे. छोट्यातील छोट्या वस्तूपासून ते महागड्या वस्तूपर्यंत तुम्हाला आता जास्त किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे घरचं बजेट चांगलंच कोलमडणार आहे.

नेहमीप्रमाणे तंबाखू, सिगारेट, गुटखा,पानमसाला महागणार आहे. त्याचबरोबर हॉटेलिंग करणे, पार्लर, पर्यटन, जीममध्ये जाणं आता महागात पडणार आहे. ऑनलाईन किंवा शॉपिंग करताना आता क्रेडिट, डेबिट कार्ड सांभाळून वापरावं लागणार आहे. कारण क्रेडिट, डेबिट कार्डवरून खरेदी करणं महागणार आहे. तसंच आर्किटेक्टकडून घराचं डिझाईन तयार करून घेणं महागणार आहे. ऍम्ब्युलन्स सेवा स्वस्त करण्यात आली खरी पण हॉस्पिटलमधील उपचार महागणार आहे. कुरिअर, लग्नाचे मंडपाची फी आणि एजंटकडून विमानाचे तिकीट मागवणे महागात पडणार आहे.

काय होणार महाग

तंबाखू
सिगारेट
गुटखा
पानमसाला
हॉटेलमध्ये जेवण
ब्युटी पार्लर
पर्यटन
जीम
क्रेडिट,डेबिट  कार्डवरून खरेदी
हॉस्पिटलमधील उपचार
कुरिअर
लग्नाचे मंडपाची फी
एजंटकडून विमानाचे तिकीट मागवणे
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close