रावसाहेब शेखावतांच्या उमेदवारीने सुनील देशमुख नाराज

September 23, 2009 10:31 AM0 commentsViews: 1

23 सप्टेंबर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांची अमरावती मधून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे अमरावतीतून इच्छुक असलेले अर्थराज्यमंत्री सुनील देशमुख नाराज झालेत. उमेदवारी मिळविण्यासाठी ते गेले काही दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले होते. परतल्यानंतर केवळ राष्ट्रपतींचा मुलगा आहे म्हणून उमेदवारी देणं हे चुकीचं आहे, असं सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. उमेदवाराचं नाव जाहीर झाल्यावरच आपली भूमिका जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं आहे.

close