बजेटमधील महत्वाच्या घोषणा

February 28, 2015 3:13 PM0 commentsViews:

budget323228 फेब्रुवारी : अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यांनी आज शनिवारी संसदेत बजेट सादर केलं. विकासाचा संकल्प करत जेटलींनी इन्कम टॅक्समध्ये वाढ केली नाही. कॉर्पोरेटकरांना दिलासा, सेवकरात वाढ आणि कस्टम ड्युटीत कपात करण्यात आल्यामुळे ‘कही खुशी,कही गम’ असे पडसाद उमटत आहे. नेमकं जेटली यांनी कोणत्या घोषणा केल्यात ?

टॅक्स कसे राहतील?
– कॉर्पोरेट टॅक्स 30 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणणार – 5 टक्के कपात
– येत्या 4 वर्षांत कॉर्पोरेट टॅक्समध्ये 5 टक्क्यांची कपात
– इन्कम टॅक्समध्ये कोणतेही बदल नाहीत
– परदेशी मालमत्तांवरचे टॅक्स रिटर्न न भरणार्‍यांना 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद
– उत्पन्न आणि मालमत्ता लपवणार्‍यांना 10 वर्षांची शिक्षा
संपत्ती कर रद्द, 1 कोटींवरच्या उत्पन्नावर सरचार्ज
– सेवाकर 12.36 वरून 14 टक्के

या केल्यात घोषणा

- लघुउद्योगांना चालना देण्यासाठी मुद्रा बँकेसाठी 20 हजार कोटी

- पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक 70 हजार कोटींनी वाढणार

- केंद्रीय करांचा 62 टक्के कर राज्यांकडे, 38 टक्के केंद्राकडे

- मनरेगासाठी 34,600 कोटी रुपयांची तरतूद

- सबसिडीसाठी जॅम संकल्पनेचा वापर करणार

- जे-जनधन, ए-आधार, एम-मोबाईलचा वापर होणार

- 2022 पर्यंत शहरी भागात 2 कोटी आणि ग्रामीण भागात 4 कोटी घरं देणार

- अशोक चक्र असलेले भारतीय बनावटीचे सोन्याचे कॉईन बनवणार

- निर्भया फंडसाठी अतिरिक्त 1 हजार कोटी देणार

- ईपीएफमध्ये कर्मचार्‍यांचा वाटा ऐच्छिक असावा

- 150 देशांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’, पर्यटन वाढवण्यासाठी उपक्रम

- जम्मू-काश्मीर, पंजाब, तामिळनाडू, आसाममध्ये एम्सची स्थापना

- महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड नॅशनल इन्स्टिट्यूट फार फार्मास्युटिकल रिसर्च

- कर्नाटकमध्ये आयआयटीची स्थापना करणार

- आरोग्य क्षेत्रासाठी 33 हजार 150 कोटी रूपयांची तरतूद

- संरक्षणासाठी 2 लाख 46 हजार कोटी

- 1 लाखांपेक्षा जास्त खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक

- काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी बेनामी व्यवहार विरोधी विधेयक आणणार

- अल्पसंख्याक तरुणांसाठी नई मंझिल योजना

- 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला रोजगार देणार

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close