नारायण राणेंच्या नावाने जाहीरात द्यायची का – मुंबई हायकोर्ट

September 23, 2009 12:58 PM0 commentsViews: 2

23 सप्टेंबर नारायण राणेंना आता नोटीस काढायची की त्यांच्या नावानं जाहिरात द्यायची, असा संतप्त सवाल हाय कोर्टानं केला आहे. 26/11 च्या हल्ल्यात राजकीय नेत्यांचा हात असल्याचं राणेंनी म्हटलं होतं. या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी करताना हायकोर्टानं सरकारी वकिलांना हा सवाल विचारला. नारायण राणेंच्या मंत्रालयाततील कार्यालयात आणि ज्ञानेश्वरी या सरकारी बंगल्यावर वारंवार नोटीस पाठवली. मात्र राणेंनी ती स्वीकारली नव्हती. त्यामुळे कोर्टात अनुपस्थित राहिलेल्या राणेंच्या प्रकरणात पुढील आठवड्यात निर्णय देणार असल्याचं कोर्टाला स्पष्ट केलं आहे.

close