मनसेनं केली बजेटच्या प्रतिंची होळी

February 28, 2015 9:45 PM0 commentsViews:

28 फेब्रुवारी : मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत सादर केला. मात्र जेटली यांनी सादर केलेल्या बजेटला आता विरोध होऊ लागला आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील अल्का टॉकीज चौकात बजेट विरोधात आंदोलन करण्यात आला. हा बजेट महागाई वाढविणारा असल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी बजेटच्या प्रतिंची होळी केली. जेटली यांनी सादर केलेल्या बजेट मध्ये सर्व सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करण्यात आला नाही असं महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच म्हणणं आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close