ठाकूरशाही संपवण्यासाठी वसईत सर्वपक्षीय आघाडी

September 23, 2009 1:01 PM0 commentsViews: 5

23 सप्टेंबर वसईतली ठाकूरशाही संपवण्यासाठी शिवसेना, भाजपा, मनसे, काँग्रेस, जनता दल या पक्षांनी निवडणूकीत आघाडी केली आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात बुधवारी वसई जनआंदोलन समितीतर्फे विवेक पंडित यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मध्यंतरी वसई-विरोर महापालिकेतून 21 गावं वगळ्यासाठी समितीने मोठं आंदोलन छेडलं होतं. त्याची दाखल घेत राज्य सरकारने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती. त्याचवेळेस बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना आगामी निवडणुकीत शह देण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी पंडित यांनी उमेदवारी अर्ज भरला. वसई जनआंदोलन समितीच्या चिन्हावर ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

close