सतीश शेट्टी हत्या प्रकरण : सीबीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍याने रोखली अटक

March 2, 2015 4:17 PM0 commentsViews:

02 मार्च : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणात आता नवीन वळण मिळालंय. सीबीआय स्वतःच या तपासात जाणूनबुजून मोडता घालत असल्याचा आरोप सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी केलाय. आरोपींची अटक वरिष्ठ अधिकार्‍यांनी थांबवली असा दावा तपास अधिकारी एस. पी. सिंग यांनी संदीप शेट्टी यांच्याशी बोलताना केला आहे. संदीप शेट्टी व एस.पी. सिंग यांच्यातील संपूर्ण संभाषण आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहे.

13 जानेवारी 2010 रोजी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे आरटीआय कार्यकर्ते यांची भरदिवसा धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या काही महिने आधी सतीश शेट्टींनी लोणावळ्याजवळील एक भूखंड खरेदीचे प्रकरण उघड केले होते. या भागातील मोठमोठे भूखंड बोगस पद्धतीने खरेदी केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर शेट्टींना अनेकदा धमकी देण्यात आली आणि 4 महिन्यांतच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचा तपास पोलिसांनी संथपणे केला. हत्येच्या दीड वर्षानंतर ऑगस्ट 2011 रोजी तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. देशातली ही सर्वात प्रभावी समजली जाणारी तपास यंत्रणाही तपासात अपयशी ठरली आहे. आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या एका ऑडियो क्लिपमुळे सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सीबीआयचे तपास अधिकारी एस.पी. सिंग आणि सतीश शेट्टींचे भाऊ संदीप यांच्यातला हा संवाद संदीप शेट्टींनीच रेकॉर्ड केला आहे. 12 जुलै 2014ला पुण्यातील आकुर्डी इथे एस.पी. सिंग संदीप शेट्टींना सांगत होते की, त्यांचे वरिष्ठ अधिकारी कुणालाही अटक करण्याची परवानगी देत नव्हते. त्यामुळे तपासाला खीळ बसला… सीबीआयचे अधिकारी राक्षस असून तपास रोखण्यासाठी ते मंत्र्यांकडूनही पैसे उकळतात असा खळबळजनक दावाही सिंग यांनी केला आहे.

45 मिनिटांची ऑडियो क्लिप आपण कोर्टात सादर करणार आहोत, असं संदीप शेट्टींनी म्हटलंय. या क्लिपची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आयबीएन लोकमतने एस. पी. सिंग यांच्याशी संपर्क साधला. पण मला मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही आणि तुम्ही काय बोलताय, त्याबद्दल मला काहीच माहीत नाही असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. त्यामुळे जोवर कोर्ट किंवा तज्ज्ञ शिक्कामोर्तब करत नाहीत, तोपर्यंत हे सर्व संदीप शेट्टींचे दावे ठरणार आहेत. आयबीएन लोकमतने दाखवलेल्या या संभाषणाची दखल सीबीआय घेईल का, हे लवकरच स्पष्ट होईल.

संदीप शेट्टी व एस.पी. सिंग यांच्यातील फोनवरील संपूर्ण संभाषण खालीलप्रमाणे :

संदीप शेट्टी – आप ने अरेस्ट का पहला अप्लिकेशन 2012 में किया है, राईट? 2012 के बाद में दो साल हो गए…
एस. पी. सिंग – नहीं, उस के बीच में और एक दिए थे. दूसरा प्रपोजल दिया, तब गुप्ता ही था.
संदीप शेट्टी – पहले भी गुप्ता ही थे ना?
एस. पी. सिंग – गुप्ता व्हीटो करता था. उस ने लिखा है पहला प्रपोजल भेजा तभी की सम वेस्टेड इंटरेस्ट आर बेंट अपॉन.
संदीप शेट्टी – क्या बात कर रहे हो?
एस. पी. सिंग – दिखाऊंगा मैं ने रखा है. मैं ने बोला की वेस्टेड इंटरेस्ट कौन है? फाईल में लिखा है.
संदीप शेट्टी – फाईल में लिखा है?
एस. पी. सिंग – हमारा क्या इंटरेस्ट है? वेदर यू आर इन अ पोजिशन टू पे मी?
संदीप शेट्टी – हा हा. नो.
एस. पी. सिंग – देन? हू विल पे मी? फॉर इंप्लिकेटिंग समबडी आय शुड हॅव सम मोटिव्ह . मैं ने भी कॉपीज रखी है. मैं ने नोकरी छोडी ना, तो मैं दिखाऊंगा इन को. अगर इन्हों ने मुझे मजबूर किया नोकरी छोडने के लिए, तो मैं ने भी कॉपी कर के रखा है.
संदीप शेट्टी – कल को कोर्ट में कोई स्ट्रिक्चर पास हुआ तो वो आय.ओ. (एस.पी. सिंग) के खिलाफ ही पास होगा.
एस.पी. सिंग – मुझे कोई वो नहीं है. मेरे दिमाग में जितना था, मैं ने कोशिश की है. आय ऍम स्टक अप विथ द किलर. किसी को पकडेंगे तभी मैं करूंगा ना. नहीं पकडने दे रहे है वो तो.
संदीप शेट्टी – तो आप ने फॅक्ट्स नहीं बताए उन को?
एस.पी. सिंग – स्पेशल डायरेक्टर मेरे उपर इतना चढ गया की यह जमीन का क्यूँ ले लिया? तुम बढाते ही जा रहे हो. मैं ने कहा मुझे सुना जाए. दो घंटा मुझे लेक्चर दिया.
संदीप शेट्टी – आप मेरे को एक बात बताइये लेकिन ये गवरमेंट चेंज का इफेक्ट है क्या इस में?
एस.पी. सिंग – ये (CBI अफसर) गवरमेंट के चक्कर में नहीं होते. ये सब पैसे के राक्षस हैं. ये तो मंत्रियों से पैसे लेते है. आप क्या समझते हो इन को. गवरमेंट से नहीं डरते ये लोग.
एस.पी. सिंग – ये तो मर्डर केस है. अगर इस में न्याय नहीं मिलेगा, तो कोई किसी को भी मार सकता है.
संदीप शेट्टी – एक्झॅक्टली ना! वैसे ही हो जाएगा.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close