राज्यातील काँग्रेसमधल्या फेरबदलामुळे नारायण राणे संतप्त

March 2, 2015 8:11 PM0 commentsViews:

02 मार्च :  लोकसभे पाठोपाठ विधानसभेत झालेलेल्या दारूण पाराभवामुळे मरगळ आलेल्या काँग्रेसमध्ये आज महत्त्वाचे बदल झाले. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलीये. तर मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई शहराध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या बदलांमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नाराजी दर्शवली आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा न करताच अशोक चव्हाण आणि संजय निरूपम यांची निवड केल्याचा आरोप नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींवर केला आहे. त्यासोबतच काँग्रेसमध्ये काम आणि गुणवत्तेवर पद मिळत नसल्याचा आरोप केलाय. पक्षात काम आणि कार्य विचारात घेतलं जात नाही असं म्हणत त्यांनी पक्षश्रेष्ठींवर तोफ डागली आहे. मी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं म्हणून मला डावललं का?, असा सवालही राणेंनी यावेळी उपस्थित केला आहे. त्याशिवाय माझ्यासारख्या नेत्याच्या मानसिकतेचा विचार पक्षाने करायला हवा होता, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

नारायण राणेंनी अशोक चव्हाणांच्या कुवतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच संजय निरुपम यांच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय उपयोग असा सवाल केला आहे. मुंबईचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या पदावर एका मराठी माणसाची नियुक्ती करणं गरजेचं असल्याचं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close