‘मल्टिप्लेक्समध्ये मराठीला प्राईम टाईम’

March 2, 2015 8:29 PM0 commentsViews:

02 मार्च :  मराठी सिनेमांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज (सोमवारी) पुण्यात मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईम दिला जाईल अशी घोषणा केली.

मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्समध्ये नेहमी दुजाभाव मिळतो. तसेच प्राईमटाईममध्ये मराठी सिनेमा हा मल्टिप्लेक्समध्ये जवळपास दाखवलाच जात नाही ही बर्‍याच वर्षापासूनची स्थिती आहे. मराठी निर्मात्यांनी मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या विरोधात बरीच ओरड सरकारसमोर या आधीच केली होती. शिवसेना चित्रपट सेना आणि मनसे चित्रपट सेना यांनीही या विरोधात आंदोलनं केली होती. त्यामुळे तावडेंच्या या निर्णयामुळे बरीच वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close