डौलाने फडकतोय तब्बल 250 फूट उंचावर महान तिरंगा !

March 3, 2015 5:08 PM0 commentsViews:

indian bigest flag3303 मार्च : ‘झंडा उंचा रहे हमरा…’असं हे राष्ट्रगाण म्हणताना प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलते यात शंका नाही. पण भारतीयांना अभिमान वाटावा असा महान तिरंगा साकारण्यात आलाय. आता हरियाणामध्ये आतापर्यंतचा जगातला सर्वात मोठा असा तब्बल 250 फूट उंचावर महान तिरंगा डौलाने फडकतोय.

आजपर्यंत नवी मुंबई महापालिकेवर फडकणारा तिरंगा हा देशातला सर्वात मोठा झेंडा होता. पण, आता या झेंड्याला मागे टाकलंय हरियाणातल्या फरिदाबादमधल्या एका झेंड्याने…फरिदाबादमध्ये आज जगातला सर्वात मोठा तिरंगा फडवकण्यात आला.

नव चेतना ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा महान तिरंगा डौलाने फडकलाय. 250 फूट उंच खांबावर हा तिरंगा फडकतोय. तर नवी मुंबई महापालिकेवर असलेला झेंडा 225 फूट उंच आहे.

फरिदाबादमधल्या झेंड्याची लांबी ही 96 फूट आणि रुंदी 64 फूट आहे. तर नवी मुंबईतल्या झेंड्याची लांबी 75 फूट आणि रुंदी 50 फूट आहे. पण, नवी मुंबईतल्या झेंड्याचं वजन मात्र जास्त आहे. फरिदाबादमधल्या झेंड्याचं वजन आहे 48 किलो तर नवी मुंबईतल्या झेंड्याचं वजन तब्बल 54 किलो आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close