सफर समुद्री दुनियेची..!

March 3, 2015 6:59 PM0 commentsViews:

मुंबईमध्ये फिरायला येणार्‍या सगळ्यांसाठीच एक खुशखबर आहे. आता त्यांना माशांच्या जगातही फेरफटका मारता येणार आहे. गेल्याअडीच वर्षांपासून तारापोरवाला मत्स्यालय नुतनीकरणासाठी बंद होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मत्स्यालयाचं उद्घाटन होणार आहे. मत्स्य-व्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी या मत्स्यालयाची पाहणी केली. सुमारे 21 कोटी रूपये खर्चून हे नूतनीकरण करण्यात आलंय. या मत्स्यालयात 400 विविध प्रकारच्या जातींचे मासे ठेवण्यात आलेत. यामध्ये अनेक दुर्मिळ माशांचाही समावेश आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close