आदेश बांदेकरला माहिमची उमेदवारी निश्चित

September 24, 2009 11:14 AM0 commentsViews: 7

24 सप्टेंबर शिवसेनेनं माहिममधून अभिनेते आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरुन आमदार सदा सरवणकर आणि मिलिंद वैद्य यांच्यात रस्सीखेच सुरू होती. वैद्य यांच्यासाठी सेनानेते मनोहर जोशी प्रयत्न करत होते. त्यामुळे सरवणकरांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाऊन शक्तीप्रदर्शन केलं. या कार्यकर्त्यांनी नंतर मनोहर जोशी यांच्या घरासमोर हुल्लडबाजीही केली होती. त्यामुळेच यावर तोडगा म्हणून अखेर शिवसेनेनं अभिनेते आदेश बांदेकर यांना माहीममधून उमेदवारी दिली आहे.

close