मुंबईत अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार

March 3, 2015 8:37 PM0 commentsViews:

rape-victims-मुंबई (03 मार्च) : अंधेरीतल्या जेडी नगर परिसरातील एका 5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर आरे कॉलनी परिसरात बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीये.

या घटनेनंतर पीडित मुलीवर कुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी तिची प्रकृती बिघडल्यानं पुढील उपचारासाठी केईम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

यासंदरर्भात सहार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात रिक्षावाल्याविरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, या घटनेला आता 24 तास उलटूनही यामध्ये आत्तापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close