राज्यसभेत मोदी सरकारवर ओढावली नामुष्की !

March 3, 2015 8:46 PM0 commentsViews:

modi in rajasabha303 मार्च :  राज्यसभेत अल्पमतात असलेल्या मोदी सरकारवर आज नामुष्की ओढवली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये काळा पैसा परत भारतात आणण्याबद्दल पुरेसे समाधानकारक स्पष्टीकरण नाही यावर कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांनी राज्यसभेत मतदान मागितलं. त्यांच्या बाजूनं 118 तर विरोधात 57 असं मतदान झालं. राज्यसभेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे मतदान झालं. राष्ट्रपतींचं अभिभाषण दोन्ही सभागृहांमध्ये सहमतीने मंजूर करण्याची प्रथा आहे.

आज राज्यसभेत आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला. परंतु, सीताराम येचुरी यांनी या प्रस्तावातील काही दुरस्त्या मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मतदान घेण्याची वेळ आली. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी येचुरींना विनंती केली. पण, त्यांनी माघार घेतली. काँग्रेसच्या नेत्यांनाही मध्यस्ती करण्याची विनंती करण्यात आली. पण, त्यांनीही पुढाकार घेतला नाही. अखेरीस प्रथा मोडून मतदान घेण्यात आलं. येचुरी यांच्या बाजूनं 118 तर विरोधात 57 असं मतदान झालं.

काय घडलं राज्यसभेत ?

- राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील सुधारणा राज्यसभेत मंजूर
– काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून दिली होती सुधारणा
– कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनी दिली होती राज्यसभेत सुधारणा
– सुधारणेवर राज्यसभेत झालं मतदान
– सरकार राज्यसभेत अल्पमतात असल्यामुळे राज्यसभेत 118 तर विरोधात 57 सुधारणा झाली मंजूर
– सरकारसाठी मोठी नामुष्की
– काळ्या पैसा परत आणण्याबाबत सरकारने समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही
– या मुद्द्यावर येचुरींची होती सुधारणा

(सविस्तर बातमी लवकरच)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close