मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात आप-काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

March 3, 2015 10:24 PM0 commentsViews:

03 मार्च : यवतमाळच्या दौर्‍यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍यात घोषणाबाजी झाली. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा आज दौरा आले असता आप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली. शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यात यावी, मागील मदत देण्यात आली नाही आताच्या नुकसानीची मदत कधी देणार असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे राजकारणात एकमेकांचे विरोधक असलेले दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र पाहून स्थानिकही आश्चर्यचकीत झाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close