…तर विकास आराखडा केराच्या टोपलीत टाका -उद्धव ठाकरे

March 3, 2015 10:23 PM0 commentsViews:

03 मार्च : मुंबई विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नसेल तर तो केराच्या टोपलीत टाका अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबई विकास आराखड्यावर रंगशारदा सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विकास आराखड्यावर कडाडून टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाने बनवलेल्या विकास आराखड्याचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नसेल तर तो केराच्या टोपलीत टाका अशी टीकाच उद्धव यांनी केली. तसंच विकास आराखडा हा मराठी भाषेतच असावा असंही त्यांनी बजावलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close