रेपो रेटमध्ये कपात, गृह कर्जधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता

March 4, 2015 9:45 AM0 commentsViews:

repo rate

04 मार्च :  रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज (बुधवारी) पुन्हा एकदा रेपो दरात कपात केली असून, रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. यामुळे गृह कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी रेपो दर 7.75 टक्के होता. आता तो 0.25 टक्क्यांनी कमी करून 7.50 टक्के करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात दुसर्‍यांदा कपात करण्यात आली आहे. याआधी जानेवारी महिन्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कमी करून 7.75 टक्के करण्यात आला होता.

आरबीआयने रेपो दरात कपात केली असली तरी, ‘कॅश रिझर्व्ह रेशो’ (सीआरआर) 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. रेपो दरांमधील कपातीमुळे गृह कर्जधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close