राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगतापांच्या घरावर ‘एसीबी’चा छापा

March 4, 2015 3:19 PM0 commentsViews:

04 मार्च : पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे विश्वासू समजले जाणारे सुभाष जगताप यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (बुधवारी) पहाटे छापा टाकला. या छाप्यात दीड कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

सुभाष जगताप आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर ज्ञात संपत्तीपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप आहे. महिनाभरापासून एसीबीकडून जगताप यांची गुप्त चौकशी सुरू होती. त्यांनी स्वत:ची पिठाची गिरणी हा एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत असल्याचं सांगितलं होतं. पण, प्रत्यक्षात त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा दीड कोटी रुपयांची जास्त मालमत्ता असल्याचं आढळून आली. त्याशिवाय तळजाई परिसरातील प्लॉटच्या व्यवहारात दलालीचं उत्पन्नही त्यांनी ‘टीडीएस’न भरता घेतल्याचं उघडकीस आलंय. आज लाचलुचपत विभागाने अवैध संपत्ती बाळगल्याच्या आरोपाअंतर्गत पहाटे पाचच्या सुमारास सुभाष जगताप यांच्या धनकवडीतील घरावर छापा टाकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close